खट्याळपणाच्या बाबतीत बॉलीवूडमध्ये आपला हात कोणीच धरू शकत नसल्याचे बॉलीवूडचा ‘पोर्टेबल चार्जर’ म्हणून ओळख असलेल्या रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
सोमवार ६ जुलै रोजी रणवीर सिंगच्या वाढदिवशी बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रणवीरला शुभेच्छा देत त्याच्याजवळ एक खास विनंती केली होती. काहीवर्षांपूर्वी चर्चेचा विषय ठरलेल्या ताहिर शहाचे ‘आय टू आय’ हे गमतीशीर गाणे सादर करण्याची इच्छा ऋतिकने रणवीरजवळ व्यक्त केली.

रणवीरनेही ऋतिकच्या इच्छेला मान देत  ‘आय टू आय’ गाण्याचे डबस्मॅश करून व्हिडिओ शेअर केले आहे. त्यासोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल रणवीरने ऋतिकचे आभार देखील व्यक्त केले. हा डबस्मॅश खास ऋतिकसाठी करत असल्याचेही तो पुढे म्हणाला. ताहिर शहाचे ‘आय टू आय’ गाणे काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. गाण्यातील ताहिरचा गमतीशीर अंदाज आणि गाण्याची नेटकरांनी त्यावेळी भरपूर खिल्ली उडवली होती.

Story img Loader