दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. येत्या २५ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ढोलिडा हे पहिले गाणे प्रदर्शित झाले. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. आलिया भट्ट ही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच आलियाने अभिनेता रणवीर सिंहसोबत ढोलिडा गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
आलिया भट्ट ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर ढोलिडा गाण्यावर थिरकणाऱ्या नेटकऱ्यांचे रिल्स शेअर केले आहे. त्यासोबतच तिने रणवीर सिंहसोबतचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीर हा नेहमीप्रमाणे एका वेगळ्याच पद्धतीने नाचताना दिसत आहे. त्याला पाहिल्यानंतर आलिया हसायला लागते.
यानंतर आलिया त्याला या गाण्यातील एक स्टेप दाखवते आणि तोही ती स्टेप हुबेहुब कॉपी करतो. आलिया आणि रणवीरचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी त्या दोघांच्याही डान्सचे कौतुक केले आहे.
“काल मी दोन वर्षांनी…”, सुशांतच्या निधनानंतर कामावर परतलेल्या रिया चक्रवर्तीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ढोलिडा हे पहिले गाणे आहे. या पहिल्या गाण्यात आलिया भट्टचा जबरदस्त डान्स आणि स्टाइल पाहायला मिळत आहे. यात आलिया ही पांढऱ्या रंगाच्या साडीत ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे. या गाण्यात तिच्या आजूबाजूला अनेक महिला तिला डान्स करत चीअर करताना दिसत आहेत. हे गाणे एखाद्या जल्लोषाचे असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘ढोलिडा’ हे गाणे साहिल हाडने संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणे जान्हवी श्रीमंकर गायले असून कृती महेशने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. या गाण्याला लाखो व्ह्यूज असल्याचे पाहायला मिळत आहे.