रणवीर आणि अभिनेत्री कल्की कोचलीन एका कार्यक्रमावेळी एकत्र मौजमस्ती करताना दिसून आल्याने आता नवीन चर्चेला उधाण आले आहे. मिकी मॅक्लेरच्या ‘द बारटेंडर’ या अल्बमच्या अनावरण सोहळ्याला बुधवारी या रणवीर आणि कल्की उपस्थित होते. गेले अनेक दिवस रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यातील प्रेमकरणाची प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, रणवीर आणि कल्कीच्या या मौजमजेमुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्की कोचलीन आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यातील नातेसंबंध संपुष्टात आल्यामुळे या दोघांनी नुकतीच एकमेकांपासून फारकत घेतली आहे. मात्र, या पार्टीतील मौजमस्ती बघता कल्कीच्या जीवनात काही विशेष फरक पडला नसल्याचे दिसून आले. दीपिका पदुकोण सध्या परदेशात सुट्ट्यांसाठी गेली असून रणवीर सिंग झोया अख्तरच्या ‘दिल धडकन दो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा