रणवीर सिंगचा सिम्बा सध्या बॉक्स ऑफीसवर जोरजदार चालत आहे. रणवीरचे चाहते हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. मागली आठवड्यात प्रदर्शित झालेल्या आपल्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी थेट चित्रपटगृहात पोहोचले. यावेळी त्यांनी चाहत्यांमध्ये मिसळत त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. खुद्द रणवीर आल्याचे कळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला एकच गराडा घातला. कोणी सेल्फी काढण्यासाठी तर कोणी त्याला शेकहँड करण्यासाठी त्याच्या जवळ जात होते. यावेळी त्याची चाहती असलेल्या एका महिलेला रणवीरने अचानक कीस केले. आता असे काय घडले असेल की रणवीरने त्या महिलेला कीस करावे.

तर तिने रणवीरला सांगितले की तिचा पाय फ्रॅक्चर असूनही ती सिम्बा पाहायला आली आहे. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता रणवीरने तिच्या गालावर पापी दिली. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली. एका ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडियो अपलोड करण्यात आला असून तो कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भारताप्रमाणे कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परदेशातील जवळपास ९६३ स्क्रिनवर हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दोन दिवसांत ‘सिम्बा’ नं अनपेक्षित कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या चित्रपटाचं आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय कलेक्शन हे जवळपास ३४ कोटींहून अधिक आहे.

https://www.instagram.com/p/Br8EOu9jxji/

तर भारतात या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगण यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं रणवीर, सारा आणि अजय हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. खास रोहित शेट्टीचा टच असलेल्या या चित्रपटात रणवीरच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं गेलं. शाहरुखच्या ‘झिरो’ चित्रपटाला सिम्बाने जोरदार टक्कर दिली आहे.

Story img Loader