बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच रणवीर आणि दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात रणवीर हा दीपिकाला विमानतळावर सर्वांसमोर किस करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपिका गाडीतून उतरत असतेवेळी लगेचच रणवीर तिला घ्यायला जातो. त्यानंतर ते दोघेही हातात हात घालून चालत असतात. त्यावेळी रणवीर स्वत: फोटोग्राफर्सला बाजूला व्हा असे सांगताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही पापाराझींना फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
यावेळी काही फोटोग्राफर्स हे रणवीर आणि दीपिकाच्या आगामी 83 चित्रपटाबद्दल बोलतात. त्यावेळी रणवीर म्हणतो या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत आणि काही क्षणात तिच्या गालावर किस करतो. रणवीरने दीपिकाच्या गालावर किस केल्याचे पाहताच पापराझी ‘वन्स मोअर, वन्स मोअर’ करुन ओरडू लागतात.
Video : हातात हात, भांगेत कुंकू अन् लाल चुडा, नवविवाहित कतरिना-विकीचा लूक पाहिलात का?
दरम्यान रणवीर आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत.
दरम्यान लवकरच रणवीर आणि दीपिका हे ’83’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. ’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.