ranveer-rawअनेक चित्रपटांमधून आपल्या रफटफ अवतारात दिसणारा आघाडीचा अभिनेता रणवीर कपूर ‘किल-दिल’ या आगामी चित्रपटात गुळगुळीत चेहऱ्याच्या लूकमध्ये दिसणार आहे. असे असले तरी, चित्रपटात आपण साकारत असलेली व्यक्तिरेखा मेट्रोसेक्स्युअल नसल्याचा दावा रणवीरने केला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार कधी मिशा वाढवून अथवा केसांना तिलांजली देऊन चित्रपटातील व्यक्तिरेखेशी एकरूप होणारा रणवीर अनेकवेळा पाहाण्यात आला आहे. ‘किल-दिल’ या आगामी चित्रपटात रणवीर सिंग दाढी-मिशा नसलेल्या गुळगुळीत चेहऱ्याच्या युवकाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील आपल्या लूक विषयी माहिती देताना तो म्हणाला, चित्रपटातील माझे लूक चांगले नसल्याची मला जाणीव आहे. परंतु, सुंदर दिसण्यापेक्षा चित्रपटात साकारत असलेल्या व्यक्तीरेखेच्या गरजेनुसार दिसण्यास प्राधान्य दिले. त्याचमुळे डोक्यावर कटोरा कटमधील लाल रंगाचे केस आणि दाढी-मिशा नसलेल्या स्वच्छ चेहऱ्याच्या युवकाचा लूक धारण केला. असे काही चित्रपट असतात की ज्यात तुम्ही ग्लॅमरस दिसणे गरजेचे असते, परंतु ‘किल-दिल’ चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा ग्लॅमरस नसून, हा युवक मेट्रोस्क्स्युअल नाहीये. खरतर, तो एका गरीब कुटुंबातील युवक आहे.
ranveer-rawचित्रपटात परिणिती चोप्रा एका श्रीमंत मुलीची भूमिका साकारत असून, या तरुणाच्या आयुष्यात तिच्या येण्याने बदल होतो. ती रणवीरला जीवनातील काही चांगल्या गोष्टी शिकवते. रणवीर साकारत असलेली व्यक्तिरेखा ही फार मृदू स्वभावाच्या युवकाची आहे. ‘गुंडे’ आणि ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ चित्रपटांनंतर माझ्यातील मृदु, निष्पाप आणि आकृष्ट करणारे हावभाव पडद्यावर साकारणे गरजेचे असल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक शाद अलीने सांगितल्याचे रणवीर म्हणाला. १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी ‘किल-दिल’ चित्रपट प्रदर्शित होत असून, चित्रपटात गोविंदा आणि अली जफर यांच्यादेखील भूमिका आहेत.

Story img Loader