अभिनेता रणवीर सिंह हा कायमच त्याच्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. पण आता रणवीर सिंग हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच रणवीरच्या या न्यूड फोटोशूटवर त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.

याबद्दल दीपिका पदुकोणला विचारले असता ती म्हणाली, रणवीरचे हे फोटो पाहिल्यानंतर दीपिका फारच प्रभावित झाली होती. तिला या फोटोशूटची संकल्पना खूप आवडली होती. रणवीरने इंटरनेटवर हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मलाही ते आवडले होते. दीपिका ही नेहमीच रणवीरला पाठिंबा देत असते. त्यामुळे जेव्हा रणवीरने हे फोटो शेअर केले तेव्हा ती फारच उत्साही होती.

या फोटोशूटबद्दल रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडे ला प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली, रणवीरच्या या शूटचे नियोजन खूप आधीच करण्यात आले होते. रणवीर सिंगला या शूटबद्दल सर्वकाही स्पष्टपणे माहिती होते. तो ते करण्यास फार उत्सुक होता. रणवीर हा दररोज विविध फॅशनचे कपडे परिधान करत असतो. त्याच्या निवडीबद्दल चाहतेही त्याचे कौतुक करतात. त्यामुळे रणवीरने न्यूड फोटोशूट करणं ही इतकी मोठी बाब नक्कीच नाही. तो नेहमीच नवनवीन गोष्टी करण्यासाठी फारच उत्साही असतो.

दरम्यान रणवीरने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ पेपर मासिकासाठी हे फोटोशूट केलं आहे. डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. याचसोबतच रणवीरच्या मुलाखतीमधील काही वाक्यंही यासोबत शेअर करण्यात आली आहे. “मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. मला चांगले कपडे घालायला, छान छान खायला आवडतं. मी दिवसातील २० तास काम करतो पण कधीच याबाबत तक्रार करत नाही. मी या सर्व गोष्टींसाठी फार आभारी आणि कृतज्ञ आहे. मात्र यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागलेत. मी आज ‘गुची’ सारख्या ब्रॅण्डचे कपडे घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही ब्रॅण्डेड वापरु शकतो. तरीही यावरुन कोणी माझ्याबद्दल उलटसुटल बोलत असेल तर त्याची मी पर्वा करत नाही,” असं रणवीरने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh nude photoshoot for paper magazine deepika padukone reacts nrp