विचित्र कपड्यांमुळे अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्याची हटके ड्रेसिंग स्टाईल सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पण कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांकडे रणवीर पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतो. आपल्या आवडीचेच कपडे परिधान करण्याकडे त्याचा अधिक कल असतो. पण आता रणवीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने चक्क कपडे न घालताच न्यूड फोटोशूट केलं आहे.

आणखी वाचा – VIDEO : भर कार्यक्रमात रणवीरने उडवली विजय देवरकोंडाची खिल्ली, कपड्यांवरून ट्रोल करत म्हणाला…

Bollywood Actress Shilpa Shetty Dance On Taambdi Chaamdi song
Video: शिल्पा शेट्टीला ‘तांबडी चामडी’ गाण्याची पडली भुरळ, अभिनेत्रीने केला हटके डान्स; नेटकरी म्हणाले, “ही वेडी झालीये काय?”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Toddlers strugglet to help family to sale Diwali diya heart touching video
VIDEO: खरंच परिस्थितीसमोर झुकावं लागतं! दिवाळीचे दिवे विकताना चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून म्हणाल “लेक असावा तर असा”
Viral Video: Father-Daughter Dance to Anil Kapoor's 'Dhina Dhin Dhaa' song
‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
viral video of uncle kissing a woman on a poster obscene video viral on social media
हद्दच झाली राव! माणसाने भररस्त्यात केलं महिलेच्या पोस्टरबरोबर असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अश्लील…”
Viral Video person dragged the dog
‘शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”
Father dance for his daughter on wedding day heart touching Video
“मेरी दुनिया तू ही रे” लेकीच्या लग्नात वडिलांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यांत येईल पाणी

‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीरने नेकेड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपड नसून तो पोज देताना दिसत आहे. रणवीरचा हा नवा लूक पाहून सोशल मीडियाद्वारे मात्र त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी रणवीरच्या या लूकवर ट्विटरच्या माध्यमातून मजेशीर कमेंट केल्या आहेत.

तुम्ही त्याच्या कपड्यांवर हसता पण आता काय कराल?, दीपिका पदुकोणने तुझे सगळे कपडे लाँड्रीमध्ये दिले का?, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून इतकही ट्रोल करू नका की ती व्यक्ती कपडे परिधान करण्याचंही विसरून जाईल. अशा अनेक कमेंट रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर केल्या जात आहेत.

रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करून देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. काही फोटोंमध्ये रणवीर केवळ अंतर्वस्त्रावर दिसत आहे. नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.