विचित्र कपड्यांमुळे अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्याची हटके ड्रेसिंग स्टाईल सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पण कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांकडे रणवीर पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतो. आपल्या आवडीचेच कपडे परिधान करण्याकडे त्याचा अधिक कल असतो. पण आता रणवीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने चक्क कपडे न घालताच न्यूड फोटोशूट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – VIDEO : भर कार्यक्रमात रणवीरने उडवली विजय देवरकोंडाची खिल्ली, कपड्यांवरून ट्रोल करत म्हणाला…

‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीरने नेकेड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपड नसून तो पोज देताना दिसत आहे. रणवीरचा हा नवा लूक पाहून सोशल मीडियाद्वारे मात्र त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी रणवीरच्या या लूकवर ट्विटरच्या माध्यमातून मजेशीर कमेंट केल्या आहेत.

तुम्ही त्याच्या कपड्यांवर हसता पण आता काय कराल?, दीपिका पदुकोणने तुझे सगळे कपडे लाँड्रीमध्ये दिले का?, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यांवरून इतकही ट्रोल करू नका की ती व्यक्ती कपडे परिधान करण्याचंही विसरून जाईल. अशा अनेक कमेंट रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर केल्या जात आहेत.

रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करून देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. काही फोटोंमध्ये रणवीर केवळ अंतर्वस्त्रावर दिसत आहे. नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.