बॉलीवूड अभिनेता रणवीस सिंग आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती परिणीती चोप्रा यांनी आगामी ‘किल दिल’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. नुकतेच रणवीर आणि परिणीती मुंबईच्या जवळच असलेल्य लवाला येथे चित्रपटाचे चित्रीकरण करताना दिसले होते.

सदर छायाचित्रात रंगीबेरंगी कपड्यांमध्ये घोड्यावर बसलेले परिणीती आणि रणवीर दिसत आहे.

किल दिल हा आगामी रोमॅण्टिक चित्रपट असून शाद अली खान आणि आदित्य चोप्रा याची निर्मिती करत आहेत. यात रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, गोविंदा, राणी मुखर्जी आणि अली झाफर यांच्या मुख्य भूमिका आहेत. यापूर्वी चित्रपटात दीपिका पदुकोणला मुख्य भूमिकेसाठी घेतले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर चित्रपटासाठी परिणीतीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा