बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी अभिनेत्री सुष्मिता सेनसह काही फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. ललित मोदींनी केलेल्या ट्वीटमुळे दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत लग्न झालं नसलं तरी ते डेट करत असल्याचं सांगितलं. सुष्मितासह काही फोटो त्यांनी शेअर केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ललित मोदींचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचसोबत सोशल मीडियावर दोघांचे मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. दरम्यान ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर अभिनेता रणवीर सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. ललित मोदींच्या पोस्टवर रणवीरने कमेंट केली आहे.

ललित मोदी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर रणवीरने हार्टचं इमोजी आणि कुणाचीही नजर लागू नयेसाठी असलेलं इमोजी पोस्ट केलंय. या इमोजीमधून एकाप्रकारे रणवीरने दोघांच्या नात्याबद्दल जाणून आनंद झाल्याचं दर्शवलंय.

ललित मोदींनी शेअर केलेल्या फोटोंमधुन सुष्मिता आणि त्यांच्यातील जवळीक दिसून येतेय. ललित मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “माझ्या लग्नाबाबतच्या वृत्तावर स्पष्टीकरण देण्यासाठी हे ट्वीट करत आहे. आम्ही लग्न केलेलं नाही. सध्या आम्ही केवळ एकमेकांना ‘डेट’ करत आहोत. लग्न देखील एक दिवस होईल.”

विशेष म्हणजे याआधी ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो ट्वीट केले होते. ललित मोदी यांच्या याच ट्वीटनंतर त्यांचं सुश्मिता सेनशी लग्न झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. यानंतरच ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत लग्नाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh reaction on lalit modi sushmita sen relationship kpw