भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर सगळेकडे करोनावर निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे चित्रपटसृष्टीवर ही परिणाम झाला होता. दरम्यान, आता सरकारने चित्रीकरणाला परवाणगी दिल्यानंतर बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंगने चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी लॉकडाउननंतर चित्रीकरणाला सुरुवात करणारा रणवीरचं पहिला कलाकार आहे.
“कारण टाळेबंदी उठल्यावर चित्रपटसृष्टीला चालना मिळाली पाहिजे असे रणवीरचे मत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शूटवर परतून येणारा रणवीर हा पहिला सुपरस्टार आहे. शासनाच्या आखणीनुसार सर्व प्रोटोकॉल पाळण्याबाबत सर्व प्रोडक्शन हाऊस दक्ष आहेत. करोनासाठीचा फटका बसलेल्या उद्योग क्षेत्राचे कामकाज पूर्ववत व्हावे यासाठी रणवीर आग्रही असून त्यात आपले योगदान देण्याकरिता तो घराबाहेर पडला आहे,” अशी माहिती शूटच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साक्षीदाराकडून समजते.
View this post on Instagram
आणखी वाचा : टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार, “एक मोठ्या प्रोजेक्टचे चित्रीकरण करणाक आहे. करोनामुळे याचे चित्रीकरण थांबले होते. लवकरच याविषयीची सविस्तर माहिती सगळ्यांना दिली जाणार आहे. आजचे शूट महत्त्वाचे असल्याने रणवीर त्याच्या नेहमीच्या उत्साही ‘रेडी टू गो’ अविर्भावात दिसला. जेव्हा त्याच्यासारखा एखादा उत्साही अभिनेता सेटवर येतो, तेव्हा, सर्वकाही बदलून जाते. सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याने चित्रपटसृष्टीकरता हा एक चांगला संकेत आहे.