बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीत ‘खान’ नावाच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची इच्छा असते. ज्यात सलमान खान, आमिर खान, सैफ अली खान आणि शाहरुख खान यांच्या नावांचा समावेश आहे. पण रणवीर सिंग एक असा अभिनेता आहे ज्याला या चौघांपैकी कोणासोबतच काम करायचं नाही. त्याला जेव्हा इंडस्ट्रीतील खान आडनाव असलेल्या कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायची इच्छा आहे असं विचारण्यात आलं तेव्हा त्यानं चक्क सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमुर अली खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रणवीर सिंग बॉलिवूड बिनधास्त अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमीच त्याच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे अतरंगी कपडे आणि लूक अनेकदा चर्चेत असतात. एवढंच नाही तर रणवीर सिंगची स्टेटमेंट देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. रणवीरनं आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यातील प्रत्येक कलाकारासोबत त्याचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. त्याला ‘खान’ आडनावाच्या अभिनेत्यासोबत काम करण्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर देखील तेवढंच चर्चेत राहिलं होतं.

आरजे सिद्धर्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंगला हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावर उत्तर देताना रणवीरनं तैमुर अली खानचं नाव घेतलं. तो म्हणाला, “तैमुर माझ्या म्हातारपणातला आधार आहे. तो खूप मोठा स्टार आहे आणि जेव्हा तो अभिनय करेल. या क्षेत्रात पदार्पण करेल तेव्हा माझं वय झालेलं असेल. मी म्हातारा होईन या क्षेत्रात त्यावेळी मला तैमुरच्या बापाची भूमिका साकारायची संधी मिळाली तर मी नक्कीच ते काम करेन. तो माझा म्हातारपणाला आधार आहे त्यामुळे मला वाटतं की, त्याने खूप चांगलं काम करावं, त्याला खूप चित्रपट मिळावेत आणि त्यात त्याच्या वडिलांची भूमिका मला साकारायला मिळावी.”

आणखी वाचा- रणवीरने सांगितला व्हॅनिटीमधील सेक्सचा किस्सा; करण जोहर म्हणतो, “मी ट्राय केलं…”

दरम्यान रणवीर सिंग काही दिवसांपूर्वी ३७ वर्षांचा झाला. तो अखेरचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसला होता. सध्या तो करण जोहरच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट देखील आहे. ज्यात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.