न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) उद्या (२२ ऑगस्ट) चौकशीसाठी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्याने हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. याबाबत रणवीरने चेंबूर पोलिसांना पत्रही लिहिलं आहे. अभिनेता रणवीर सिंहने ‘पेपर’ या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे.

हेही वाचा- ‘येणारे वर्ष आपल्या दोघांसाठी…. ‘ मुलाच्या वाढदिवसानिमित्त आर. माधवनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

न्यूड फोटोशूटमुळे रणवीरच्या अडचणीत वाढ

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह समोरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी त्याच्यावर मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी त्याला बजावली होती. परंतु कामात व्यस्त असल्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रणवीरने चेंबूर पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा- “आपला धर्म…” ‘बॉयकॉट लाइगर’च्या ट्रेंडवर विजय देवरकोंडाचे स्पष्ट विधान

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंगविरोधात मुंबईमध्ये एक महिला वकील आणि एका खासगी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चेंबूर पोलिसांनी रणवीरला समन्स बजावले आहे. या समन्समध्ये २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Story img Loader