अभिनेता रणवीर सिंगच्या ‘किल दिल’ या आगामी चित्रपटातील वाढदिवस सेलिब्रेशनवर आधारित गाण्याचे नुकतेच चित्रीकरण झाले. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी रणवीर सिंगने सुचविलेल्या नव्या युक्तीने सेटवर काम करणाऱया कर्मचाऱयांची धावपळ उडाली.
वाढदिवस सेलिब्रेशनच्या प्रसंगावर गाणे असल्यामुळे ‘केक’ शिवाय वाढदिवस साजरा होऊ शकत नाही हे सहाजिकच परंतु, या गाण्यात काहीतरी वेगळे असावे यासाठी रणवीरने जास्तीत जास्त केक गाण्यात वापरावेत अशी युक्ती सुचविली आणि गाण्यात तब्बल ६०० केक वापरण्याचे ठरले.
इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच प्रकारचे केक उपलब्ध करुन देताना कर्मचाऱयांची धावपळ झाली. पुणे, मुंबई आणि नवी मुंबई येथील आपल्या सर्व कर्मचाऱयांनी ६०० केक उपलब्ध करुन देण्यासाठी मेहनत घेतली असल्याचे यशराज फिल्म्सकडून सांगण्यात आले.
‘किल दिल’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग सोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा, अभिनेता अली जाफर आणि गोविंदाही दिसणार आहे. तसेच नुकताच विवाह झालेली राणी मुखर्जीही या चित्रपटात असल्याचे समजते.

Story img Loader