बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. रणवीर हा अनेक ब्रॅंड्सचा ब्रॅंड अम्बॅसिडर आहे. त्यात रणवीरची खेळातली आवड पाहचा तो आता भारताच्या NBA ब्रॅंडचा ब्रॅंड अम्बॅसिडर झाला आहे. सोशल मीडियावर फोटो आणि मोशन पोस्टर शेअर करत रणवीरने या विषयी सांगितले आहे. मात्र, यावेळी त्याच्या या फोटोवर कमेंट करत अभिनेता अर्जुन कपूरने त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो आणि मोशन पोस्टर शेअर केले आहे. रणवीरने प्रिंटेड पांढऱ्या रंगाचं जॅकेट आणि पॅन्ट परिधान केली आहे. “एनबीएच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने भारताच्या NBAचा ब्रॅंड अम्बॅसिडर होण्याचा मला आनंद आहे. मला बास्केट बॉल आणि NBA लहानपणापासून आवडत,” असे कॅप्शन रणवीरने त्या फोटोला दिले आहे. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : ऐश्वर्याचे आराध्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
रणवीरचा हा फोटो पाहिल्यानंतर जवळचा मित्र अर्जुन कपूरने त्याला ट्रोल केले आहे. “भावा तू Subtle माणूस आहेस,” अशी कमेंट करत अर्जुनने रणवीरला ट्रोल केले आहे. दरम्यान, लवकरच रणवीर कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. यात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पादुकोण, साकिब सलीम, ताहिर राज भसीन आणि आणखी काही कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या व्यतिरिक्त रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘तख्त’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.