‘राम लीला’ चित्रपटामधील सहकारी अभिनेत्री दिपिका पदुकोण हिच्यासोबत नाव जोडले जात असतानाच रणवीर कपूर याने दिपिका व त्याच्या संबंधांविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. रणवीरने मंगळवारी त्याच्या आगामी ‘गुंडे’ चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व अफवांवर विश्वास नठेवता ‘गुंडे’वर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले.
दरम्यान, ५ जानेवारीला वयाची २८ वर्षे पूर्ण केलेल्या दीपिकाने तिचा वाढदिवस रणवीरसोबत न्युयॉर्क येथे साजरा केल्याची छायाचित्रे माध्यमांमधून झळकली.
काल संध्याकाळी ‘गुंडे’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी घेण्यातआलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकारांनी रणवीरला चित्रपटा ऐवजी दिपिका व त्यांच्यामधील संबंधांवर प्रश्न विचारायला सुरूवात केली. रणवीरणे मात्र दिपिका विषयाला बगल देत उपस्थितांवर संतापत त्याच्या आगामी ‘गुंडे’ चित्रपटावर चर्चा करण्यास भाग पाडले.
” ‘गुंडे’ हा एक अॅक्शन चित्रपट आहे. ‘वायआरएफ’ ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अर्जून कपूर, प्रियांका आणि माझी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका असून अली अब्बासने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होत असून, पाहाण्यासाठी आवश्य या,” असा टोमणा रणवीरने पत्रकारांना मारला.     

Story img Loader