रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. समिक्षकांकडून चित्रपटाला मिळालेली प्रशंसा, रणवीरचा दमदार अभिनय आणि शेट्टीच्या दिग्दर्शनाचा तडका प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यास यशस्वी झाला आहे. शाहरूखच्या ‘झिरो’कडून अपेक्षाभंग झाल्यानंतर ‘सिम्बा’कडे प्रेक्षक अधिक वळू लागले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींहून अधिक कमाई करण्यास ‘सिम्बा’ यशस्वी झाला आहे.

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १८ कोटींहून अधिक कमाई केली असेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीष जोहर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना वर्तवला आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रशंसेनंतर ‘सिम्बा’चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे २५ कोटींच्या घरात जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे.

रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगन यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं रणवीर, सारा आणि अजय हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. खास रोहित शेट्टीचा टच असलेल्या या चित्रपटात रणवीरच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं गेलं. ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ऑस्ट्रेलियात या चित्रपटानं ८८. ५८ लाखांची कमाई पहिल्या दिवशी केली आहे. भारतात ४०२० स्क्रिन तर जगभरातील ९६३ स्क्रिनवर ‘सिम्बा’ प्रदर्शित झाला.

Story img Loader