अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत विवाहबंधनात अडकलेल्या रणवीर सिंगनं दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे रणवीरनं ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला आलेला अनुभव आपल्या पोस्टमधून मांडला आहे. आतापर्यंत बाजीराव, अल्लाउद्दीन खिल्जी यांसारख्या ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारा रणवीर पहिल्यांदाच ‘सिम्बा’ चित्रपटाच्या निमित्तानं वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून येत्या ३ डिसेंबरला ‘सिम्बा’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित होत आहे. पण त्याआधी ही भूमिका साकरणं किती अवघड होतं हे रणवीरनं व्हिडिओद्वारे सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित शेट्टीसोबत काम करणं माझं स्वप्न होतं. हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे. ही भूमिका साकारताना त्यात अनेक बारकावे होते रोहित शेट्टीनं ते उत्तमरित्या समजावून सांगितले आणि माझ्याकडून उत्तम अभिनय करून घेतला. मी साकारलेल्या सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक भूमिका होती असं रणवीरनं आपल्या व्हिडिओमधून म्हटलं आहे.

रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न’ हे दोन्ही चित्रपट हिट ठरल्यानंतर ‘सिम्बा’ कडूनही प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा आहेत. २८ डिसेंबरला ‘सिम्बा’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीरबरोबर सारा अली खान आणि सिद्धार्थ जाधवसह अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत.