अभिनेता रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यावर काहींनी त्याला ट्रोल केले होते, तर काहींनी रणवीरला समर्थन दिले होते. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला़ गेला होता. नुकतंच या संपूर्ण प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीर सिंगच्या विरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी त्याला बजावली होती. पण कामात व्यग्र असल्याचे कारण देत त्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे सांगितले होते. त्यासोबतच त्याने दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही चेंबूर पोलिसांकडे केली होती. यानंतर २९ ऑगस्ट रोजी रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली आणि आपला जबाब नोंदवला.

KCB: यंदा ‘या’ प्रश्नांची उत्तरं न आल्याने स्पर्धकांनी सोडला खेळ; यापैकी किती उत्तरं तुम्हाला माहितीये?

इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, फोटोंवरून वाद सुरू झाल्यापासून रणवीर फार शांत आहे. रणवीरला त्याच्या कायदेशीर टीमने या वादानंतर मीडियासमोर कोणतेही वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला होता. त्याला याप्रकरणी प्रतिक्रियेसाठी खूप कॉल्स आणि मेसेज आले होते, पण त्याने मौन बाळगत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रणवीरच्या वकिलांनी त्याला आपले म्हणणे थेट पोलिसांसमोर मांडण्यास सांगितले होते. याबद्दल मीडियासमोर काहीही न बोलण्यास वकिलांनी सांगितलं होतं. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण चौकशीदरम्यान रणवीर खूप शांत होता. तसेच ते फोटो आपण अपलोड किंवा प्रकाशित केले नाहीत, असंही त्याने सांगितलं.

“या न्यूड फोटोंचे परिणाम काय होतील हे माहित नव्हते. आपण शूटिंग दरम्यान अभिनेता म्हणून आपली भूमिका बजावली, असं रणवीरने सांगितलं,” अशी माहिती सूत्राने दिली.  

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh told police he was not aware of effects of nude photo shoot hrc
Show comments