लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग धर्मशाला इथं सुरू आहे.
१९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव धर्मशाला इथं रणवीर आणि त्याच्या संपूर्ण टीमला क्रिकेटचे धडे देणार आहे. त्यासोबतच तेव्हाच्या काही आठवणीसुद्धा शेअर करणार आहे. बुधवारी रणवीरनं धर्मशाला स्टेडियमवर चांगलाच घाम गाळला. रणवीर आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट १५ दिवस इथं एकत्र राहतील आणि क्रिकेटचे बारकावे शिकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

ज्यांनी ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केलेल्या बलविंदर सिंग यांची भूमिका एमी विर्क वठविणार आहे. क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. त्याचप्रमाणे त्याकाळी इंडिया टीमचे उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकीब सलीम दिसणार आहे.

सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना वठविणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. १९८३ मध्ये मान सिंग वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh trains with kapil dev on 83 sets in dharamshala