कपड्यांची हटके स्टाईल म्हणा किंवा प्रसारमाध्यमांसमोर बिनधास्तपणे प्रेयसीविषयी प्रेम व्यक्त करणे असो, अशा एक ना अनेक बेधडक कृत्यांसाठी प्रसिद्ध असणारा बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या आणखी एका कृतीने सर्वांना अचंबित केले आहे. रणवीर सिंगने शनिवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होत असताना लाईव्ह ट्विट करून पुन्हा एकदा आपल्या ‘वेडे’पणाची खात्री पटवून दिली.
He injected my neck ! Whoa! !
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 4, 2015
About to get knocked out!
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 4, 2015
Live tweet from the operation theatre !! pic.twitter.com/jVud7qKFOL
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 4, 2015
रणवीर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव-मस्तानी या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या चित्रीकरणादरम्यान, सेटवर त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत अगदी गंभीर नसली तरी, रणवीर फिजिओथेरेपीचे उपचार घेत होता. मात्र, हे उपचार तितकेसे यशस्वी न ठरल्यामुळे डॉक्टरांनी रणवीरला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आज रणवीर सिंगवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, या ठिकाणीही त्याचा अवखळपणा कमी झाला नाही. शस्त्रक्रियेआधी भूल देण्यापूर्वी शस्त्रक्रिया विभागातील साद्यंत वृत्त रणवीर ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत होता. अखेर त्याच्या मानेत इंजेक्शन देण्यात आल्यानंतर रणवीरने ट्विट करण्याचे थांबविले. त्यानंतर अजूनपर्यंत तरी त्याने कोणतेही ट्विट केलेले नाही. मात्र, तो या सगळ्यातून लवकरात लवकर बरा होवो, अशा शुभेच्छा त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर दिल्या.