‘लुटेरा’ चित्रपटाच्या प्रसिद्धिनंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रणवीर म्हणाला की, मला आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील चांगल्या चित्रपटांमध्ये आमिरने काम केलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
तसेच, बॉलीवूडने माझ्या चित्रपटांना दिलेला प्रतिसाद ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ‘बॅंड बाजा बारात’सारख्या यशस्वी चित्रपटाने मी माझ्या करियरची सुरुवात केली. याच आधारावर मला ‘रामलीला’ आणि ‘गुंडे’ यांसारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. रणवीरने २०१० साली चित्रपटसृष्टीतील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘बॅंड बाजा बारात’, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘लुटेरा’ यांसारखे हिट चित्रपट रणवीरने केले आहेत.
करियरच्या सुरुवातीलाच यश मिळालेल्या रणवीरने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या परिवारास दिले आहे. माझे वडिल स्पष्टवादी आहेत. माझ्या चुकीच्या वर्तणुकीवर मला त्यांचा ओरडा पडतो. तू काय करतोयस ? असा का वागत आहेस ? अशा प्रकारचे बोल लावून वडिलांनी माझ्यावर नियंत्रण ठेवले आहे. मी १३-१४ वर्षांचा असल्यापासून माझे दोन खास मित्र आहेत. त्यांनी नेहमीच ख-या मित्राचे कर्तव्य निभावले असून माझ्या कामावर ते टीकाही करतात. सामान्य मुलाप्रमाणे ते मला वागणूक देतात. अशा व्यक्ति जवळ असल्यावर तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही, असे रणवीर म्हणाला.

Story img Loader