खांद्याच्या शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी दिलेला आरामाचा सल्ला तसेच बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो आणि आय़फा पुरस्कार सोहळ्याच्या समालोचनाची तयारी यात व्यस्त असलेला रणवीर सिंग प्रकाश पदुकोण यांचा साठावा वाढदिवस साजरा करण्यासाठी बंगरुळमध्ये उपस्थित राहून दिपीकाला दिलेले वचन पूर्ण करणार आहे.
५ जुन रोजी दिपीकाचे वडिल आणि माजी बॅडमिंटन पटू प्रकाश पदुकोण यांचा ६० वा वाढदिवस आहे. हा दिवस दीपिका आणि रणवीरने धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले होते. परंतू आयफा सोहळ्याची सुरुवात देखील याच दरम्यान होत आहे. त्यामुळे या सोहळ्यातील रणवीरच्या सहभाहाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. असे असले तरी रणवीर बंगरुळमध्ये उपस्थित राहणार असून दीपिकाला दिलेले वचन पूर्ण करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई मिररमध्ये प्रसारीत झालेल्या वृत्तानूसार याबाबतची कल्पना रणवीरने आयोजकांना दिली असल्याचे समोर आले आहे. पदुकोण कुटूंबियांबरोबर दिवस घालवल्यानंतर ६ जून रोजी रणवीर मलेशियामध्ये परतणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा