बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. रणवीरने ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. रणवीर फक्त अभिनयक्षेत्रातच नव्हे तर जाहिरात क्षेत्रामध्येही कार्यरत आहेत. बऱ्याच जाहिरातींमध्ये आपण त्याला पाहिलं आहे. याचनिमित्त रणवीरला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : पुणे विमानतळावर ‘पावनखिंड’ चित्रपट सुरु होता अन्…; प्रत्यक्ष बाजीप्रभु देशपांडेंचं घडलं दर्शन

रणवीरला नुकतंच ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर ऑउ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीरने यानिमित्त काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यादरम्यान रणवीर म्हणाला, “मी पहिली जाहिरात कंडोम कंपनीसाठी लिहिली होती. माझा पहिला चित्रपट हिट होता. त्यानंतरचे प्रदर्शित झालेले दोन चित्रपट काही खास नव्हते. जाहिरात करण्यासाठी मला खूप वाट पाहावी लागत होती. चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर बऱ्याच जाहिरातींसाठी मला विचारण्यात यायचं. चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतरच जाहिरात कर म्हणजे अधिक पैसे मिळतील असा सल्ला मला त्यावेळी दिला जायचा.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “माझी काही स्वप्न होती ज्यामुळे तेव्हा मी सतत चिंतेत असायचो. अधिकाधिक जाहिरात करणाऱ्या कलाकारांसारखं मलाही बनायचं होतं. तेव्हा मला कंडोमच्या जाहिरातीची कल्पना सुचली. कंडोम कंपनीला माझी ती कल्पना आवडली. त्यानंतर घडलेला इतिहास तुमच्या समोर आहे. आज ब्रॅण्ड एण्डॉर्स ऑफ द इयर म्हणून माझा गौरव करण्यात आला आहे.”

आणखी वाचा – Video : “न्यूड फोटोशूटसाठी पुरस्कार मिळाला का?” रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

कंडोम जाहिरातीमधूनच रणवीरने जाहिरातक्षेत्रात पदार्पण केलं. बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये रणवीरचा देखील समावेश आहे. इतकंच नव्हे तर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये रणवीरचाही नंबर लागतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh writing first ad for condom company actor awarded as endorsement of the year 2022 see details kmd
Show comments