बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या सहकलाकारांच्या कामाची नेहमीच प्रशंसा करतो.  दीपिका पदुकोण सध्या हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होतेय. त्यासाठी रणवीरने तिला शुभेच्छा तर दिल्याचं पण त्याचसोबत तो आपल्या भावाच्या चित्रपटासाठीही उत्सुक आहे. अहो गडबडून जाऊ नका. हा काही त्याचा सख्खा भाऊ नाही. तर रुपेरी पडद्यावरील त्याच्या भावासाठी तो पुढे सरसावला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीरच्या लहान भावाची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता वैभव तत्ववादीचा आज ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचा हा चित्रपट सर्वांनी पाहावा याकरिता रणवीरने एक व्हिडिओ तयार केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय लीला भन्साली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटात रणवीर आणि वैभवने अनुक्रमे ‘बाजीराव’ आणि ‘चिमाजी अप्पा’ या भूमिका साकारल्या होत्या. रुपेरी पडद्यावर या दोघांमध्ये मतभेद असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, पडद्यामागे या दोघांमध्ये चित्रीकरणादरम्यान चांगलीच गट्टी जमली. मग आपल्या या भावासाठी रणवीर मागे कसा राहिल. त्याने एक व्हिडिओ तयार केला असून त्यात म्हटले की, हाय मी रणवीर सिंग, माझा भाऊ वैभव तत्ववादीचा ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ चित्रपट बघायला विसरू नका. तसेच, त्याने बॉलीवूडमधील आपल्या मित्रमंडळींनाही हा चित्रपट पाहण्यास सांगितलेय.
वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, उमा सरदेशमुख आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.