बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्यांनी आतापर्यंत जास्तकरून थंडपेये आणि चिप्सच्या जाहिरातीत काम केले आहे. पण, आता ही परंपरा रणवीरने मोडली असून, तो कंडोमच्या जाहिरातीत झळकणार आहे.
रणवीर ड्यूरेक्स या कंडोम ब्रॅण्डच्या जाहिरातीत दिसेल. या रणवीर म्हणाला की, गेले साडेतीन वर्ष मी चित्रपटसृष्टीचा भाग आहे. यादरम्यान मला अनेक जाहिरातीच्या ऑफर मिळाल्या. पण त्यासाठी नकार देत योग्य ब्रॅण्डची जाहिरात करण्याचे ठरवले. मी आता ड्यूरेक्स या कंडोम ब्रॅण्डसाठी जाहिरात करत आहे. सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी प्रचार करण्यात काहीच चुकीचे नाही आहे. हे सामाजिक कार्य आहे. देशातील तरुणांना सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी संदेश देणे गरजेचे आहे. याच कारणामुळे मी ही जाहिरात केली.
कंडोमच्या जाहिरातीत रणवीर सिंग!
बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्यांनी आतापर्यंत जास्तकरून थंडपेये आणि चिप्सच्या जाहिरातीत काम केले आहे.

First published on: 25-03-2014 at 04:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singhs condom ad hits the spot