मॉडेलवर बलात्कार करून तिला मारहाण केल्याच्या आरोपप्रकरणी अटक करण्यात आलेला हिंदी चित्रपट अभिनेता इंद्रकुमार सराफ (४०) याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिले. वर्सोवा पोलिसांनी शुक्रवारी इंद्रकुमारला मॉडेलवर बलात्कार आणि मारहाण प्रकरणी अटक
केली होती.
इंद्रकुमारला शनिवारी वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याच्यावर ठेवण्यात आलेला आरोप गंभीर असून प्रकरणाच्या चौकशीसाठी वेळ हवा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच त्यासाठी त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंतीही केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली. परंतु दहा दिवसांऐवजी इंद्रकुमारला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालयाबाहेर इंद्रकुमारच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना तो निर्दोष असल्याचा आणि त्याला संबंधित मॉडेलने या प्रकरणात नाहक गोवल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा