एका रॅपरच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्याचा मृतदेह त्याच्या भाड्याच्या घरात आढळला आहे. त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती, ती पोलिसांनी जप्त केली आहे. अभिनव सिंह असे या रॅपरचे नाव आहे. तो ‘जगरनॉट’ या नावाने ओळखला जायचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओडिया रॅपर अभिनव सिंह (Abhinav Singh found dead) उर्फ जगरनॉटने आत्महत्या केली आहे. तो इंजिनिअर होता आणि बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता. अभिनव बंगळुरूतील कडुबीसनहल्ली येथे राहायचा, तिथेच त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मृतदेह आढळला. अभिनवने बुधवारी (१२ फेब्रुवारी) विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या पत्नीवर आरोप केले आहेत.

पत्नीबरोबर झालेल्या भांडणामुळे त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं, असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. पत्नीकडून छळ होत असल्याने त्याचा मानसिक त्रास होत होता, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा अभिनयच्या कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अभिनवने लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली असून त्याआधारे तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी तपास केला सुरू

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी अभिनवचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे. तक्रारीत रॅपर अभिनवचे वडील विजय नंदा सिंह यांनी ८ ते १० जणांची नावे नोंदवली असून सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. अभिनवचा पत्नी आणि इतरांकडून मानसिक छळ होत होता, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेचा तपास सुरू असून, अभिनवच्या मृत्यूचे कारण नेमके काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

‘जगरनॉट’ नावाने ओळखला जाणारा अभिनव सिंह हा ओडिया इंडस्ट्रीतल लोकप्रिय रॅपर होता. ‘कटक अँथम’ या त्याच्या हिट गाण्यामुळे त्याला ओळख मिळाली होती.