गाण्यात अश्लील शब्द वापरल्याबद्दल रॅप गायक हनी सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादग्रस्त गाण्याबद्दल हनी सिंगवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते.
हनी सिंग याच्या ‘मै हू बलात्कारी’ या गाण्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दोन आठवडय़ांपूर्वी याबाबतचा आपला अहवाल तयार करून गृहमंत्रालयाला सादर केला होता, तसेच कारवाई करण्याबाबत सूचना केली. मात्र तरीही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. या प्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप करीत सरकारवर ताशेरे ओढले. अखेर गृहमंत्रालयाने नवानशहर पोलीस ठाण्याला हनी सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी हनी सिंगविरोधात कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in