बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मोठ्या पडद्यावर बेधडकपणे शर्ट काढत हाणामारीची दृष्ये साकारताना अनेकांनी पाहिले आहे. परंतु, चित्रपटात जेव्हा चुंबनदृष्य साकारण्याची वेळ येते, तेव्हा अशा प्रकारची दृष्ये साकारताना हाच अॅक्शन हिरो कमालीचा लाजतो. आत्तापर्यंत सलमान खानने मोठ्या पडद्यावर अशी दृष्ये देण्याचे टाळले आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार ‘किक’ या आगामी चित्रपटात तो चुंबनदृष्य देताना नजरेस पडणार असून, चित्रपटातील त्याच्या नायिकेबरोबर ही खास दृष्ये चित्रीत करण्यात आली आहेत. साजिद नाडियादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस ही सलमान खानची नायिका आहे. चित्रपटाशी संबंधीत जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात सलमान खान आणि त्याच्या नायिकेबरोबर काही खास प्रणयदृष्ये चित्रीत करण्यात आलेली आहेत. आत्तापर्यंत मोठ्या पडद्यावर अशा प्रकारची दृष्ये साकारताना सलमान खानला पाहण्यात आलेले नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले. असे असले तरी, ‘किक’ मध्ये किस आहे का नाही ह्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अखेर सलमानने चुंबन दृष्य दिले?
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मोठ्या पडद्यावर बेधडकपणे शर्ट काढत हाणामारीची दृष्ये साकारताना अनेकांनी पाहिले आहे. परंतु, चित्रपटात जेव्हा चुंबनदृष्य साकारण्याची वेळ येते...

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-07-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare moment salman khan kisses jacqueline fernandez in kick