Anant Ambani and Radhika Merchant Haldi Ceremony : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा चालू आहे. येत्या १२ जुलैला हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. मूळ लग्न समारंभ सुरू होण्यापूर्वी सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ अंबानींच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालिया येथे पार पडला. यासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावली होती.

अनंत – राधिका यांच्या मेहंदी व हळदी समारंभासाठी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी व आदित्य ठाकरे यांनी खास अँटालियावर उपस्थिती लावली होती. हळदी समारंभ संपल्यावर ठाकरे कुटुंबीय घरी परतत असतानाचा हा व्हिडीओ पापाराझी वरिंदर चावलाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. याशिवाय सलमान खान, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, रणवीर सिंह, गायक राहुल वैद्य, खुशी कपूर, ओरी असे बरेच सेलिब्रिटी सुद्धा या समारंभाला उपस्थित होते.

Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

हेही वाचा : Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरे थिरकले शाहरुख-काजोलच्या गाण्यावर; व्हिडीओ पाहिलात का?

रश्मी व तेजस ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी अंबानींच्या संगीत सोहळ्याला देखील उपस्थिती लावली होती. तर, मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याला देखील ठाकरे कुटुंबीय उपस्थित राहिले होते. अनंत अंबानींचं बालपण जामनगरमध्ये गेलं आहे. तसंच त्यांच्या आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म देखील याठिकाणी झाला असल्याने अंबानी कुटुंबीयांनी प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरची निवड होती. तर, आता अनंत-राधिकाचा भव्य विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे.

हेही वाचा : “आरोपीला फाशी द्या”, जयवंत वाडकर यांची पुतणी आहे ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणातील पीडिता; म्हणाले, “सगळे पुरावे…”

दरम्यान, अनंत-राधिकाचं लग्न मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान-सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली-अनुष्का शर्मा, विकी – कतरिना कैफसह अनेक स्टार्सची नावे आहेत. याशिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील भारतात उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader