Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे सहा दिवस बाकी राहिले आहेत. १२ जुलैला मुंबईत मोठ्या थाटामाटात अनंत-राधिकाचं लग्न होणार आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ आणि गरबा नाईटनंतर काल, ५ जुलैला अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या संगीत सोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांसह दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे यांनी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याआधी पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या मामेरू समारंभाला देखील रश्मी ठाकरे तेजस ठाकरेंबरोबर उपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर काल देखील संगीत सोहळ्यात दोघं पाहायला मिळाले. यावेळी दोघांच्या खास लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा –Video: अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमात डफली वाजवत ओरीचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी रश्मी ठाकरेंनी आयव्हरी आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेली सिल्कची साडी नेसली होती. या साडीवरील गुलाबी आणि हिरव्या कॉम्बिनेशनचे ट्यूलिप फ्लोरल प्रिंट उठून दिसत होते. तसंच तेजस यांनी शाही निळ्या रंगाचा सिल्कचा कुर्ता परिधान केला होता. ज्यावर त्यांनी कुर्त्याला मॅचिंग असा स्टोल घेतला होता. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील दोघांचा हा लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात एन्ट्री, अंबानी-मर्चंट कुटुंबाने केलं जंगी स्वागत

हेही वाचा – Video: जब्या-शालूचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुम्ही लग्न करा…”

अनंत-राधिकाच्या लग्नाचा मुहूर्त

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी दोघं लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.