दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा व अभिनेत्री रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरूच असतात. ‘डिअर कॉम्रेड’ व ‘गीता गोविंदम’ चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. त्यानंतर विजय-रश्मिका दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सध्या दोघांचा कॅफेमधील लंच डेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : “सीतेची भूमिका संपल्यावर पुन्हा असे कपडे…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे ‘आदिपुरुष’ फेम क्रिती सेनॉन ट्रोल

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना एकत्र कॅफेमध्ये त्यांची मित्रमंडळी आणि कुटुंबीयांबरोबर मजा करताना दिसत आहेत. विजय-रश्मिकाबरोबर कॅफेमध्ये गौतम तिन्ननुरी, आनंद देवरकोंडा आणि दिग्दर्शक शेर्या वर्मा पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : खुशी कपूर करतेय प्रसिद्ध गायकाला डेट? ‘त्या’ गाण्यात अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना कॅफेमधील हा व्हायरल व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते भलतेच खूश झाले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नक्कीच यांच्या लग्नाची तयारी सुरू असणार…”, तर दुसऱ्या एका युजरने “विजय-रश्मिका माझी फेव्हरेट जोडी असून त्यांनी लवकरच लग्न केले पाहिजे,” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत. दोघांच्या अनेक चाहत्यांनी “असे वैयक्तिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे अत्यंत चुकीचे आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रश्मिकाचे विजयच्या घरच्यांबरोबर खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघेही अनेकदा लंच, डिनरला एकत्र जाताना दिसतात. यापूर्वीही दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी या ‘डिअर कॉम्रेड’ जोडीने २०२३ च्या नववर्षाचे स्वागत एकत्र केले अशाही चर्चा होत्या परंतु, विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे भाष्य केलेले नाही. दोघांमधील नात्याच्या अफवा त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे सुरू झाल्या होत्या.

Story img Loader