दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील यशस्वी करिअरनंतर रश्मिका मंदाना आता हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अलिकडेच तिने अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याबरोबर ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. हा चित्रपट फारसा चालला नाही तरीही रश्मिकाच्या अभिनयाची चर्चा मात्र झाली. त्यानंतर आता रश्मिका लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे.
रश्मिका मंदानाच्या आगामी ‘मिशन मजनू’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या टीझरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी नुकतीच रश्मिकाने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला बरंच ट्रोल केलं जात आहे. हा व्हिडीओ पाहून रश्मिका ओव्हर अॅक्टिंग’ करत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
रश्मिका मंदानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युजरने त्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “असं वाटतंय की की कराटे मॅचसाठी आली आहे आणि प्रत्येकवेळी तीच सेम हाताची पोझ का देते. झालं ना चित्रटात आता संपलं सगळं.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “ती हाताची पोझ नेहमीच का देते ही. आता हे खूप कंटाळवाणं वाटत आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “आता खूप झालं हिचं… कार्टुनसारखी दिसतेय… सिनचानची बहीण दिसतेय.” याशिवाय काहींनी तर तिचा ड्रेस कारटे युनिफॉर्मसारखा दिसत असल्याचंही म्हटलं आहे.
आणखी वाचा-रश्मिका मंदानाचं ‘कांतारा’शी नेमकं काय कनेक्शन, चित्रपटाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे होतेय ट्रोल
दरम्यान रश्मिका काही दिवसांपूर्वीच कन्नड इंडस्ट्रीमध्ये तिच्यावर बंदी घातल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्याने चर्चेत आली होती. ती म्हणाली होती, “जे आत घडतं ते आतच राहतं. मी माझ्या इनबॉक्समध्ये काय चाललंय हे लोकांना कधीच सांगत नाही. मला नाही वाटत माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण लोकांनी यावर खूपच ओव्हर रिअॅक्ट केलं आहे. मी प्रत्येकाला समजावू शकत नाही की मला काय म्हणायचं आहे. ते त्यांच्यावर अवलंबून आहे की ते काय समजतात. कन्नड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास मी कधीही तयार आहे.”