‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे चाहते नव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. येत्या शनिवारी ‘बिग बॉस १६’ला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाशी निगडीत नवनवीन माहिती समोर येत आहे. अभिनेता सलमान खान या पर्वामध्येही सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये दिसेल. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. सर्कस या विषयावर नव्या पर्वाची थीम आधारित आहे.
सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्याचा ‘टायगर ३’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याशिवाय तो मेगास्टार चिरंजीवी याच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून काम करताना दिसेल. ‘गॉडफादर’ चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. सलमान चिरंजीवी व्यतिरिक्त आणखी एका दाक्षिणात्य सेलिब्रिटीसह दिसला आहे. त्याने एका पुरस्कार सोहळ्यामध्ये पुष्पा फेम रश्मिका मंदानासह डान्स केला.
आणखी वाचा – जेव्हा दाक्षिणात्य अभिनेता दुलकिर सलमान म्हणतो, “आपला हाथ भारी…“
नुकताच लोकमतने आयोजित केलल्या एका पुरस्कार सोहळ्याला सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रश्मिका मंदाना देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती. दरम्यान एकाच वेळी दोघांनाही स्टेजवर बोलवण्यात आले. तेव्हा त्याने रश्मिकाबरोबर तिच्या ‘सामी सामी’ या गाण्यावर डान्स केला. या कार्यक्रमामध्ये नाचतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी ती आणि गोविंदा या गाण्यावर डान्स करताना दिसले होते.
रश्मिका मंदानाचा ‘गुड बाय’ हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, आशिष विद्यार्थी, सुनील ग्रोवर अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. रश्मिका चित्रपटाच्या टीमसह प्रमोशन करताना दिसत आहे.