दक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. रश्मिका ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका अनेकदा एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी ते दोघेही मुंबईत डेटवर जाताना दिसले होते. यानंतर ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मिका ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. येत्या वर्षाअखेरपर्यंत ते दोघेही विवाहबंधनात अडकतील, असे बोललं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. या दोघांचे अफेअर सुरु असल्याचे अनेक अफवा पसरत आहेत. मात्र त्या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत डिनर डेटसाठी जाताना दिसले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात ते एकत्र झळकले होते. या दोन्ही चित्रपटात त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. तेव्हापासून रश्मिका आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

सबाने घेतली ह्रतिकच्या घरच्यांची भेट, ‘फॅमिली लंच’चे फोटो व्हायरल

सध्या विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. तर रश्मिका मंदाना ही सध्या विकास बहल दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna and vijay deverakonda going to get married soon by the end of the year nrp