सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शनाच्या तारखेपासून ते चित्रीकरणासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पण यादरम्यान ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील गाण्यांनी अक्षरशः लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावलं आहे. आतापर्यंत या चित्रपटातील ‘पुष्पा-पुष्पा’ आणि ‘अंगारों’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पहिल्या ‘पुष्पा-पुष्पा’ गाण्यात फक्त अल्लू अर्जुन पाहायला मिळाला होता. पण दुसऱ्या ‘अंगारों’ गाण्यात अल्लूसह नॅशनल क्रश श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना दिसली. या गाण्यात पुन्हा एकदा दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या गाण्यातील हूकस्टेपची सगळ्यांना भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण ‘अंगारों’ गाण्याने सगळ्यांना वेड लावलं असलं तरी रश्मिकाला मात्र एका मराठमोळ्या चिमुकलीचं वेड लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर रिया बोरसे नावाची एक चिमुकली खूप प्रसिद्ध आहे. तीन-साडे तीन वर्षांची असलेली रिया मराठी, हिंदी भाषेतील गाणी नेहमी गाताना दिसते. या निरागस सूराचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. तिचे सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडीओ हा कायम व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी चिमुकल्या रियाने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ आणि त्याचं मूळ तेलुगू गाणं ‘सूसेकी’ गात डान्स केला होता. ज्याचं कौतुक रश्मिका मंदानाने केलं आहे.

हेही वाचा – Video: गेली दोन वर्षे प्रेक्षक वाट पाहत असलेला क्षण अखेर येणार, ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या महाअंतिम भागात घडणार ‘ही’ गोष्ट

आधी रियाने लाल फ्रॉकमध्ये ‘अंगारों’ गाणं गात डान्स केला होता. हा व्हिडीओ पाहून रश्मिका प्रतिक्रिया देत म्हणाली, “विश, मी तुला आता मिठी मारू शकले असते.” त्यानंतर रश्मिकाच्या या प्रतिक्रियेबद्दल आभार मानण्यासाठी रियाचा पुन्हा ‘अंगारों’ गाण्यावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यावरही रश्मिकाने पुन्हा प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री म्हणाली, “आबा…माझं हृदय… मी तुला पाहणं थांबवू शकत नाही.”

रश्मिकाचे पुन्हा आभार मानण्यासाठी रियाने त्यानंतर ‘अंगारों’चं मूळ तेलुगू गाणं ‘सूसेकी’ गात डान्स केला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. रियाच्या या व्हिडीओला आतापर्यंत २४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९१ हजारांहून अधिक लाइक आहेत.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट : महासप्ताहात बहरणार प्रेमाचं नातं, सागर करणार मुक्ताला किस अन् मग…, पाहा प्रोमो

दरम्यान, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २: द रुल’ येत्या १५ ऑगस्ट प्रदर्शित होणार आहे. पण काही दिवसांपासून प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. एडिटिंग व फहाद फासिलचं काही चित्रीकरण बाकी असल्यामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna became obsessed with riya borse angaaron dance video pps