आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. नुकताच तिचा वाढदिवस होऊन गेला, अन् या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओसुद्धा शेअर केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये रश्मिकाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. आता या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी असा कयास लावला आहे की रश्मिकाने तिचा यंदाचा वाढदिवस हा तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासह एकाच घरात साजरा केला आहे. रश्मिकाने तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ ज्या ठिकाणी पोस्ट केला आहे त्याच ठिकाणची याआधी विजय देवरकोंडानेही पोस्ट शेअर केल्याचं लोकांनी बरोबर ओळखलं आहे.

आणखी वाचा : बजरंग बलीपुढे ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत नतमस्तक; या मंदिरात जाऊन घेतलं दर्शन

यामुळेच आता या दोघांचे चाहत्यांनी हा दावा केला आहे की रश्मिका आणि विजय दोघेही एकत्रच राहत आहेत आणि रश्मिकाने तिचा यंदाचा वाढदिवस विजय देवरकोंडाबरोबरच साजरा केला आहे. अर्थात हे नेटकऱ्यांनी लावलेले कयास आहे. अद्याप या दोघांपैकी कुणीच यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. मध्यंतरी असाच एकाच ठिकाणी काढलेला दोघांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता, तेव्हा पण त्यांच्यातील नात्याबद्दल प्रचंड चर्चा झाली होती.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दोघेही सध्याचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले सर्वात लोकप्रिय स्टार आहेत. दोघांनी ‘डियर कॉमरेड’ आणि ‘गीता गोविंदम’सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही लोकांना प्रचंड आवडते. सध्या रश्मिका अल्लू अर्जुनसह ‘पुष्पा २’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna celebrates her birthday with rumoured boyfriend vijay deverakonda fans gives proof avn