आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर असणाऱ्या तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटामुळे रश्मिकाला वेगळी ओळख मिळाली. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खुप उत्सुक असतात. पण तिच्या एका कृतीमुळे आता ती ट्रोल होऊ लागली आहे.
रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका घाईघाईत तिच्या कारमध्ये बसताना दिसतेय. मात्र, कारमध्ये बसल्यानंतर ती खिडकीच्या वर काही तरी शोधण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला रश्मिकाला नक्की काय करायचंय हे कोणालाही कळलं नाही. पण नंतर ती खिडकीच्या वर असलेलं साइड स्वीच शोधत असल्याचं लक्षात आलं.
यावेळी तिने केलेले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “प्लीझ अॅक्टिंग कर पण, ओव्हर अॅक्टिंग अजिबात करु नकोस”, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नॅशनल लेव्हलची ओव्हर अॅक्टिंग’. आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ही ओव्हर अॅक्टिंगपेक्षाही वरची ओव्हर अॅक्टिंग करत आहे.” तर “ही क्यूट बनण्याचा प्रयत्न करत आहे.” त्यामुळे आता रश्मिका चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे.
दरम्यान रश्मिका लवकरच ‘पुष्पा २’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली. तर आता या चित्रपटातून ती पुन्हा एकदा श्रीवल्ली म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.