दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अल्लु अर्जुनचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पुष्पामध्ये रश्मिका आपल्याला दिसली. रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. रश्मिकाने अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी नॅशनल क्रश हा टॅग आपल्या नावे केला होता. मात्र, तुम्हाला माहितीये वयाच्या १९ व्या वर्षी रश्मिकाचा साखरपुडा झाला होता.

रश्मिकाने किरिक पार्टी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०१६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटादरम्यान रश्मिका सहकलाकारा रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. तर २०१७ मध्ये त्या दोघांनी साखरपुडा केला. मात्र, २०१८ मध्ये दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि ते विभक्त झाले.

Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
Art and Culture with Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
rishi kapoor got upset with rajesh Khanna after he proposed to dimple kapadia
डिंपल यांच्या हातात होती ऋषी कपूर यांची अंगठी; राजेश खन्नांनी प्रपोज करताना ‘ती’ अंगठी पाहिली अन्…; पुढे काय घडलं? वाचा

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

त्यानंतर रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रश्मिका म्हणाली, ‘हे प्रेम नाही. प्रेम परिपूर्ण असतं. आम्ही परिपूर्ण नाही. आपल्यात अनेक दोष असतात. पण आम्ही दोघे वेगळे आहोत. आम्ही कधीही एक आत्मा होऊ शकत नाही. आम्ही एकमेकां जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि अनेक गोष्टी शिकल्या. मी तुझ्याकडून जे काही शिकले आहे ते मी इतर कोणाकडून शिकू शकणार नाही.’

आणखी वाचा : अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार

रश्मिकाने २०१४ साली क्लीन अँड केअर्स फ्रेश फेस ही स्पर्धा जिंकली. रश्मिकाने तिचं शालेय शिक्षण कुर्ग पब्लिक स्कूलमधून केलं आहे. त्यानंतर तिने एमएस रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. रश्मिकाच्या ‘डियर कॉम्रेड’ चित्रपटाचा को-स्टार आणि साऊथचा सुपरहिट अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबतच्या डेटच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सतत येत आहेत. रश्मिकाने सांगितलं एका मुलाखतीत सांगितलं की, तिला एकटं राहायला आवडतं. तर विजय म्हणतो की तो त्याचं नातं गुप्त ठेवण्यास प्राधान्य देतो.