अभिनेत्री रश्मिका मंदानाची फसवणूक झाल्याच्या बातम्या तीन दिवसांपूर्वी आल्या होत्या. तिच्या मॅनेजरने तिची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ८० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचं म्हटलं गेलं होतं. रश्मिकाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता तिने व तिच्या मॅनेजरने यासंदर्भात मौन सोडलं आहे.
“मी स्वत:चीच माफी…”, घटस्फोटातून सावरणाऱ्या मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“आमच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही. आम्ही म्युच्युअली वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही का वेगळे होत आहोत, यामागच्या अनेक अफवा पसरल्या आहेत, पण त्या अफवांमध्ये तथ्य नाही. आम्ही एकाच व्यवसायात आहोत आणि आम्ही आतापासून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं रश्मिका आणि तिच्या मॅनेजरने गुरुवारी २२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रश्मिकाची तिच्या मॅनेजरने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा केला होता. मात्र, हे दावे निव्वळ अफवा असून यात कोणतंही सत्य नसल्याचं रश्मिका व तिच्या मॅनेजरने म्हटलं आहे. दोघांनी मिळून यापुढे एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.