दाक्षिणात्य अभिनेत्री व नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचे असंख्य चाहते आहेत. तिने केवळ दाक्षिणात्यच नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रश्मिकाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. पण आज जरी ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली, तरी तिच्या आईच्या एका सल्ल्याने रश्मिकाचे आयुष्य बदलले हे फार लोकांना माहीत नाही.
आर्यन खानने निसाला पळवून नेल्यावर काय करशील? काजोलच्या उत्तराने शाहरुख खान झालेला नि:शब्द
रश्मिका मंदानाने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाखतीत सांगितले होते की तिच्या आईच्या एका सल्ल्याने तिचे आयुष्य बदलले. ती म्हणाली होती, “मी लहान असताना मला जेव्हाही काही अडचण येत असे, तेव्हा मी अनेकदा आईकडे रडत जायची, तेव्हा ती म्हणायची की तू का रडतेस? रडणं थांबव. आयुष्यातील ही सर्वात मोठी समस्या आहे, असं तुला वाटतं, पण तसं नाही.”
रश्मिका मंदाना म्हणाली होती की, “तिची आई नेहमी म्हणते की तुम्ही कितीही अडचणीत असाल, तरीही ते तुम्ही इतरांना दाखवण्याची गरज नाही. कारण तुमच्या त्रासांची कोणालाच पर्वा नाही.” रश्मिकाची आई नेहमी तिला संकटांशी लढण्याचा सल्ला देते. तसेच आपल्या आयुष्यात सगळं नीट चाललंय, हेच जगाला कळलं पाहिले, असा सल्ला रश्मिकाला तिची आई देते.
रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चा असते. अभिनेता विजय देवरकोंडाबरोबरच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे ती काही काळापूर्वी चर्चेत होती. मात्र, दोघांनीही ते फक्त मित्र असल्याचं म्हटलंय.