Rashmika Mandanna Reacts on Allu Arjun Arrest : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली. त्याला नामपल्ली कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘पुष्पा 2’ मधील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘श्रीवल्ली’ अर्थात रश्मिकाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर करून अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “आता मी जे पाहतेय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. घडलेली घटना ही दुर्दैवी आणि अत्यंत दु:खद होती. मात्र, याप्रकरणी एकाच व्यक्तीवर सर्व दोषारोप होत आहेत, हे पाहून प्रचंड वाईट वाटत आहे. ही परिस्थिती अविश्वसनीय आणि निराशाजनक आहे,” असं रश्मिका मंदाना म्हणाली.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”

रश्मिका मंदानाची पोस्ट

अल्लू अर्जुन घरी असताना पोलीस पोहोचले आणि त्याला दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला गांधी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. मग त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने अभिनेत्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा – अल्लू अर्जुनने पत्नीला किस केलं अन् हसत हसत पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला; अभिनेत्याचा अटकेआधीचा Video Viral

नेमके प्रकरण काय?

४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Live Updates