५ एप्रिल रोजी दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तो व्हिडीओ पाहिल्यावर रश्मिका व तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. इतकंच नव्हे तर काहींनी ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं होतं. याच व्हायरल दाव्यांवर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे.
वाढदिवसाच्या व्हिडीओमध्ये रश्मिकाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला होता की रश्मिकाने तिचा यंदाचा वाढदिवस हा तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासह एकाच घरात साजरा केला आहे. रश्मिकाने तिच्या चाहत्यांसाठी व्हिडीओ ज्या ठिकाणी शूट करून पोस्ट केला होता, त्याच ठिकाणची याआधी विजय देवरकोंडानेही पोस्ट शेअर केल्याचं लोकांनी ओळखलं होतं. यासंदर्भात बातम्या व पोस्ट व्हायरल झाल्या. असंच एक ट्वीट रिट्वीट रश्मिकाने कमेंट केली आहे.
सासूने रेखा यांना मारायला उगारलेली चप्पल; अवघ्या दोन महिन्यात मोडलेलं प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न
‘अय्यो… जास्त विचार करू नकोस बाबू,’ असं रश्मिकाने ट्वीट रिट्वीट करत म्हटलं आहे. त्यामुळे तिच्या व विजयच्या डेटिंग व लिव्ह इन रिलेशनशीपच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं सिद्ध झालंय.
दरम्यान, रश्मिका व विजय चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळेच त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा होत असतात. पण दोघेही आपण फक्त मित्र असल्याचं सांगतात.