कित्येक चित्रपट रसिकांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही सध्या चांगलीच चर्चेत असते. मनोरंजन क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना माधुरीने तिच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यासाठी मनोरंजन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक तरुणींचा ती आदर्श आहे. तसेच कला विश्वातील आजच्या घडीच्या अनेक अभिनेत्री तिला आदर्श मानतात. त्यातलीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. माधुरी दीक्षित हे रश्मिकाचे प्रेरणास्थान असल्याचा खुलासा तिने केला आहे.

आणखी वाचा : “मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज

माधुरी चित्रपट, वेबसीरिज, टेलिव्हिजन अशा तिन्ही ठिकाणी झळकत आहे. सध्या ती तिच्या ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या आठवड्यात लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे. यावेळचा एक प्रोमो नुकताच आउट झाला आहे.

या व्हिडीओत रश्मिकाने माधुरीला सांगितले सांगितले, “तुम्हाला माझा आदर्श मानत, तुमच्या गाण्यांवर नृत्य करत आज मी अभिनेत्री झाले आहे. आज मी इथवर पोहोचण्याचं कारण माधुरी जी तुम्ही आहात.” रश्मिकाचं हे बोलणं ऐकून माधुरीने रश्मिकाला जवळ घेत तिला मिठी मारली. यासोबतच माधुरीने रश्मिकाच्या ‘सामी सामी’ गाण्यावरही रश्मिकाबरोबर ठेका धरला असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा : आपल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कशा सोडवेल माधुरी? आगामी चित्रपट ‘मजा मा’चा ट्रेलर प्रदर्शित

‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोचे हे १० वे पर्व सुरु आहे. या पर्वात माधुरी दीक्षितबरोबरच नोरा फतेही आणि करण जोहरही परीक्षकांची भूमिका पार पाडत आहेत. रश्मिका मंदाना हिचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे ती या कार्यक्रमात येणार हे पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत.

Story img Loader