आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. रश्मिका नेहमी तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या व्यक्तीक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. रश्मिकाचे नाव अनेकदा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडले जाते. दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान रश्मिकाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. रश्मिकाने गुपचूप लग्न केली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. खुद्द अभिनेत्रीने याबाबतचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या कमाईत वाढ; नवव्या दिवशी चित्रपटाने जमवला ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला

शरवन शाह यांच्या मुलाखतीत रश्मिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने म्हणाली, की ती आधीच विवाहित आहे. रश्मिकाच्या या उत्तराने तिथे उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रश्मिका म्हणाली, की तिने एनीम कॅरेक्टर ‘नारुतो’शी गुपचूप लग्न केले आहे. अभिनेत्रीचे हे ऐकून सगळ्यांनाच हसू फुटले.

हेही वाचा- ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

जपानी एनिमे मालिका ‘नारुतो’ खूप प्रसिद्ध आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या मालिकेने वेड लावलं आहे. या यादीमध्ये रश्मिका मंदानाचे नावही समाविष्ट आहे. याबरोबरच रश्मिकाने एनीम कॅरेक्टर ‘हिनाटा’ प्रमाणे बनण्याची इच्छा व्यक्त केली. रश्मिका म्हणाली, , “नारुतोकडे माझे हृदय आहे. ते माझे आवडते पात्र आहे. मी त्या पात्राशी पूर्णपणे लग्न केले आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna reveals she is secretly married with naruto shippuden dpj