रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या रश्मिकाने चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील तिच्या ‘श्रीवल्ली’ गाण्याला प्रेक्षकांनी पसंली दर्शविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकप्रिय असलेल्या रश्मिका मंदानाने नुकतीच ‘बाजार इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक किस्से सांगितले. कुटुंबियांना भेटायला गेल्यानंतर रश्मिका घरातील सगळ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेते. घरकाम करणाऱ्या मोलकरणीलाही रश्मिका नमस्कार करत असल्याचं तिने सांगितलं. यामागील कारणही रश्मिकाने या मुलाखतीत स्पष्ट केलं. रश्मिका म्हणाली, “छोट्या मोठ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवणं, मित्रमैत्रिणींना भेटणं या गोष्टींमुळे मला आनंद मिळतो. मला दिलेले सल्लेही माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मी प्रत्येक गोष्ट माझ्या डायरीत नमूद करते”.

हेही वाचा>> “गुडघे काळे पडलेत” शिवाली परबच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले “पैठणी ड्रेसची वाट…”

हेही वाचा>> “इंग्रजी चालणार नाही, मराठीत…” चाहत्याच्या कमेंटवर प्रियदर्शनी इंदलकरचं उत्तर, म्हणाली “हे तुम्ही…”

“घरी असताना कुटुंबियांना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेण्याची मला सवय आहे. यामागे त्यांना सन्मान देणं, त्यांचा आदर करणं, हा माझा उद्देश असतो. घरात काम करणाऱ्यांच्याही मी पाया पडते. मी प्रत्येकाचा आदर करते. मला भेदभाव करायला आवडत नाही”, असं म्हणत रश्मिकाने मोलकरणीला नमस्कार करणाऱ्यामागचं कारण स्पष्ट केलं.

हेही वाचा>>३० लाखांची गाडी घेतल्यानंतर ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे फारच खास

रश्मिकाने नुकतीच झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावली होती. या अवॉर्ड सोहळ्यात रश्मिकाने लावणीवर ठेका धरला. रश्मिकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.