अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. रश्मिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमते. तिच्या चित्रपटांना तर प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चांगला प्रतिसाद देतातच पण रश्मिका ज्या ज्या कार्यक्रमांना हजेरी लावेल तिथेही तिला पाहण्यासाठी, तिच्याबरोबर एखादा फोटो काढण्यासाठी येतात. अनेकदा सेलिब्रिटींकडे त्यांचे चाहते आगळी वेगळी मागणी करताना दिसतात. रश्मिकालाही असाच अनुभव आला आहे. तिच्या एका चाहत्याने तिच्याकडे एक भलतीच मागणी केली, जी ऐकून रश्मिकाला आश्चर्यच वाटले.
आणखी वाचा : सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. रश्मिकाने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, रश्मिकाला पाहण्यासाठी तिच्या अवतीभोवती चाहत्यांची गर्दी जमली आहे. त्यातील एक चाहता तिच्या जवळ आला आणि त्याने रश्मिका मंदानाला त्याने घातलेल्या टी-शर्टवर हृदयाच्या जागी स्वाक्षरी देण्यास सांगितले. त्याची ही विचित्र मागणी ऐकून सुरुवातीला रश्मिकाने नकार दिला पण नंतर चाहत्याच्या आनंदासाठी तिने त्याच्या छातीवर स्वतःचं नाव लिहिलं.
यादरम्यान रश्मिका मंदानाच्या चेहऱ्यावरील हावभावांनी सर्व काही सांगितले. रश्मिकाचा चेहरा लाजून लाल झाला होता. रश्मिका मंदानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुसरीकडे, रशमिकाच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, ती हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली आणि तिने तिचे केस कुरळे केले होते. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी लोकांनी लाईक केले असून हा आकडा सातत्याने वाढत आहे.