माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शनाया म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या रसिकाचे अनेक चाहते आहेत. या चाहत्यांना रसिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.
रसिकाचा बॉयफ्रेण्ड आदित्य बिलागीने एक पोस्ट शेअर केलीय. हीच पोस्ट रसिकाने देखील शेअर केलीय. यात तिचा लाडका श्वान रश देखील दिसतोय. तिघांनी देखील हातात एक पाटी पकडली आहे. या पाटीवर “माझे मानव दोस्त लग्न करत आहेत” असं लिहिण्यात आलंय. तर कॅप्शनमध्ये देखील खास मेसेज लिहिण्यात आलाय. “जेव्हा रसिका रशला भेटण्यासाठी मला पहिल्यांदा घेऊन गेली तेव्हा तो म्हणाला की माझ्या वयात एका नजरेत कळतं की मुलगा आणि मुलीमध्ये काय सुरुय. म्हणूनच आम्ही तुम्हाला रशची भविष्यवाणी सांगण्याचा विचार करत आहेत” असं कॅप्शनमध्ये म्हंटलंय. तर पुढे आदित्यने “आय लव्ह यू सो मच रसिका हे अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही” असं म्हंटलंय.
‘दया कुछ तो गडबड है…”, हटके स्टाइलमुळे स्वरा भास्कर ट्रोल
रसिका आणि आदित्यच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत रसिकाने आदित्यसोबत असलेल्या नात्याची कबुली दिली होती.
पायाला दुखापत झाली असतानाही बिग बी करत आहेत ‘कौन बनेगा करोडपती’ शोचं शूटिंग, शेअर केले फोटो
तर रसिका आणि तिचा बॉयफ्रेण्ड आदित्यने अनेक फोटो शूट केले असून दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून रसिका लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. इथेच तिची ओळख आदित्यसोबत झाली. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.